चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय मार्गावर गुहागर ते पोफळीदरम्यान ३१ जुलैपर्यंत वृक्ष लागवड करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिले आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह यांनी उपोषण स्थगित केले.
सामाजिक कार्यकर्ते शाह, निसर्गप्रेमी समीर कोवळे, अजित जोशी, मंदार चिपळूणकर, दिगंबर सुर्वे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता नाझिम मुल्ला, सहायक अभियंता शाम कुणेकर, तांत्रिक सल्लागार पंकज शर्मा, तसेच मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रसाद जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी शाह म्हणाले, गुहागर ते रामपूर, साखरवाडी ते उक्ताड आणि बहादूरशेख ते पिंपळीदरम्यान रस्त्याची दुरुस्ती झाली आहे. रामपूर ते साखरवाडी, पिंपळी ते कुंभार्ली घाटमाथ्यापर्यंतचा रस्ता हस्तांतरित झाला आहे.
ठेकेदाराने चिपळूण शहर व परिसरातून जाणाऱ्या मार्गालगत वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. ही लागवड कधीपर्यंत पूर्ण होईल, अशी विचारणा त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना केली, तेव्हा त्यांनी ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 19/Jul/2025














