मंडणगड, [१९ जुलै, २०२५] : मंडणगड शहरातील साईनगर येथील गुरुछाया एन. एक्स. सोसायटीमधील एका चालकाच्या बंद घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे ३४,००० रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना १८ जुलै २०२५ रोजी सकाळी उघडकीस आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत प्रकाश विलणकर (वय ४५, व्यवसाय: चालक, रा. साईनगर, मंडणगड) यांच्या राहत्या घरात १८ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास कोणीही नसताना अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. चोरट्याने घराच्या समोरील दरवाजाचे कडी-कोयंडा उचकटून तोडून आत प्रवेश केला आणि घरातील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या.
चोरट्यांनी लंपास केलेला ऐवज:
१०,०००/- रुपये किमतीच्या १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या २ जुन्या चेन
३,०००/- रुपये किमतीची ३ ग्रॅम वजनाची सोन्याची १ जुनी चेन
१०,०००/- रुपये किमतीचा १ तोळा वजनाचा गळ्यातील जुना हार
३,०००/- रुपये किमतीच्या ३ ग्रॅम वजनाच्या कानातील १ जुना रिंग जोड
८,०००/- रुपये रोख रक्कम (५०० रुपयांच्या १६ नोटा)
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंडणगड पोलीस ठाण्यात १८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६.४५ वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ आणि ३३१(३) प्रमाणे गुन्हा (गु.र.नं. ३१/२०२५) दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 19-07-2025














