रत्नागिरी, [१८ जुलै, २०२५] : रत्नागिरी शहरातील आठवडा बाजाराकडून काँग्रेस भवनकडे जाणाऱ्या रस्त्यावर, प्रमोद महाजन क्रीडा संकुलाच्या भिंतीलगत एका बंद टपरीच्या आडोशाला गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करताना एका व्यक्तीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना १८ जुलै २०२५ रोजी पहाटे ३.२० वाजताच्या सुमारास घडली.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार आशिष अशोक भालेकर (वय ३९) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, कमलेश संतोष कदम (वय ३१, रा. ब्लॉक नं. ०३, साईसुनंदा अपार्टमेंट, शांतीनगर, रत्नागिरी) हा बेकायदेशीररित्या अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आला.
१८ जुलै २०२५ रोजी पहाटे ४.५८ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात कमलेश कदम याच्याविरोधात गु.र.नं. ३२९/२०२५, एनडीपीएस कायदा कलम ८ (क) आणि २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 19-07-2025














