दापोली : किन्हळेत सुधारित ओळीतील लावणीचे प्रात्यक्षिक

दापोली : कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागामार्फत तालुक्यातील दत्तक गाव असलेल्या किन्हळ येथे शेतकऱ्यांना भात बियाण्यांचे वाटप करण्यात आले होते. या बियाण्यांची रोपे आता लागवडीसाठी तयार झाल्याने शेतकऱ्यांना सुधारित ओळीतील लावणी पद्धतीची माहिती देण्यासाठी प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. हे प्रात्यक्षिक किन्हळ येथील शेतकरी कृष्णा येसवारे यांच्या शेतात झाले.

या प्रात्यक्षिकाच्या उ‌द्घाटनाप्रसंगी गावचे पाटील लक्ष्मण पवार, कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागातील कनिष्ठ संशोधन सहायक शिल्पा नाईक, श्रीयश पवार, अरविंद पोसकर, कृषी विभागाचे सहायक कृषी अधिकारी सूर्यकांत काष्टे, कृषी अधिकारी दर्शना वरवडेकर, वैदेही गुहागरकर उपस्थित होते. सुधारित ओळीतील लावणी ही पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत अधिक फायदेशीर असल्याचे शिल्पा नाईक यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमास शेतकरी कृष्णा येसवारे, संदेश येसवारे, अंकुश येसवारे, सुवर्णा येसवारे, शैलेश मोहिते, चंद्रकला मोहिते, रुक्मिणी रेवाळे, लक्ष्मण रेवाळे आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 19/Jul/2025