देवरुख, [१८ जुलै, २०२५]: रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर, साखरपा जवळ एका टपरीसमोर उभ्या असलेल्या ट्रकमध्ये गुरुपादप्पा सिध्दरामप्पा कल्याणशेट्टी (वय ४२, रा. एकुंडी, ता. सौदली, जि. बेळगाव, कर्नाटक) हा चालक मृतावस्थेत आढळून आला. ही घटना १८ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.०० ते १२.५१ वाजेच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुपादप्पा कल्याणशेट्टी हे त्यांचा ट्रक घेऊन रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर प्रवास करत होते. सकाळी १० ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान, ते रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर, साखरपापासून सुमारे १०० मीटर अंतरावर एका टपरीजवळ त्यांचा ट्रक उभा करून थांबले होते. याच दरम्यान, खबर देणाऱ्या एका व्यक्तीला ते त्यांच्या ट्रकमध्ये बेशुद्धावस्थेत आढळले.
तातडीने १०८ ॲम्ब्युलन्सला बोलावण्यात आले आणि त्यांना उपचारासाठी साखरपा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती गुरुपादप्पा कल्याणशेट्टी यांना मृत घोषित केले.
देवरुख पोलीस ठाण्यात १८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४.३४ वाजता आमू. क्रमांक २०/२०२५ बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 19-07-2025














