लांजात ९० वर्षीय वृद्धाचा विषारी औषध सेवनाने मृत्यू

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील गवाणे येथील ९० वर्षीय वृद्ध धकट काळ कांबळे यांचा विषारी औषध सेवनामुळे रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना १७ जुलै २०२५ रोजी सकाळी ६.१० वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, धकट काळ कांबळे यांनी १५ जुलै २०२५ रोजी आपल्या घरी चुकून उंदीर मारण्याचे विषारी औषधाचे दाण्यासारखे कण खाल्ले होते. त्यांना त्रास होऊ लागल्याने, खबर देणाऱ्या व्यक्तीने त्यांना तातडीने अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुपारी ४.३० वाजता आय.सी.यू. मध्ये दाखल केले.

त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच, १७ जुलै २०२५ रोजी सकाळी ६.१० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सिव्हिल हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी डॉ. सोहेल शेख यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आमृ. क्रमांक ३७/२०२५ बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:57 19-07-2025