शाळेच्या पडवीत नेपाळी युवकाचा मृतदेह आढळला

राजापूर : राजापूर तालुक्यातील फुपेरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पडवीत एका ३० वर्षीय नेपाळी युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. राजू जितराम चौधरी (वय ३०, रा. राजापूर ठाणा-चौमाला, मूळ देश नेपाळ) असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू चौधरी हा खबर देणाऱ्या व्यक्तीकडे गुरे चरवण्याचे काम करत होता. १७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास तो टॉयलेटला जातो असे सांगून घरातून निघाला, मात्र परत आला नाही. त्याच्या मालकाने आजूबाजूला त्याचा शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही.

१८ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास राजू चौधरी फुपेरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा क्र. १ च्या पडवीत मृतावस्थेत आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. १८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.५७ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात आमृ. क्रमांक ३९/२०२५ बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजू चौधरीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:57 19-07-2025