गुहागर : गुहागर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून सन २०२४ तालुकास्तरीय खरीप पीक स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील भात लागवड गटात अतुल हरिश्चंद्र अष्टेकर तर नागली पीक लागवड प्रकारात प्रभाकर रघुनाथ बागडे यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
ही स्पर्धा भात लागवड व नागली लागवड या दोन गटात घेण्यात आली. गुहागर तालुक्यातून नागली पीक स्पर्धेकरिता सात लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी चार लाभार्थ्यांनी पीक स्पर्धेतून माघार घेतली होती. या स्पर्धेतील भात लागवडीत अतुल हरिश्चंद्र अष्टेकर रा. वेळंब) यांचा प्रथम क्रमांक आला. तसेच गोपाळ गणेश झगडे (रा. अडूर) द्वितीय क्रमांक तर प्रणव सुधीर काडदरे (रा. शीर बुद्रुक) यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
नागली पीक लागवडीत प्रथम क्रमांक प्रभाकर रघुनाथ पागडे (रा. वाकी), पांडुरंग सोनू हाळे (रा. अडूर) यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 19/Jul/2025














