दापोली : तालुक्यातील बुरोंडी गावातील नदीवरील पुलाचा अर्धा भाग मुसळधार पावसामुळे पुराच्या प्रवाहात वाहून गेला आहे. हा पूल दोन गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा होता. अर्धा पूल वाहून गेल्याने नागरिक विशेषतः महिला, वृद्ध आणि शालेय विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत.
बुरोंडी व आसपासच्या गावांना जोडणारा हा पूल पावसाळ्यात अत्यंत महत्त्वाचा ठरतो. सध्या पूल नसल्याने नागरिकांना लांबच्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. या पुलासाठी शासनाने काही वर्षांपूर्वी निधी मंजूर करून काम सुरू केले होते. मात्र हा पूल बंधारा टाईप पद्धतीचा असल्याने त्याच्या टिकाऊपणाबाबत गावकऱ्यांकडून शंका व्यक्त होत आहेत. पूल पुरात वाहून गेल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया गेला आहे.
गावकऱ्यांनी या पुलाच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन नवीन व टिकाऊ पुलाच्या बांधकामासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. पावसाळा अजून काही काळ चालणार असल्याने अधिक नुकसान होण्यापूर्वी उपाययोजना होणे गरजेचे आहे.
पाणी वाहून गेले
हा पूर बंधारा पद्धतीचा असल्याने त्यात थोडे पाणी अडवले जात होते. त्या पाण्यामुळे आसपासच्या भागाची, जनावरांची गरज भागत होती; मात्र अर्धा पूल वाहून गेल्यामुळे आता सगळेच
पाणी वाहून गेले आहे.
प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन नवीन व टिकाऊ पूल बांधावा. पावसाळा अजून काही काळ चालणार असल्याने अधिक नुकसान होण्यापूर्वी उपाययोजना होणे गरजेचे आहे. – महादेव शिरगावकर, बुरोंडी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 19/Jul/2025














