गुहागर : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर घरटवाडी शाळेमध्ये अंजनवेल केंद्राची शिक्षण परिषद अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाली.
शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख सौ आरोही शिगवण मॅडम होत्या .त्यावेळी वेलदुर एक शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम नांदगावकर ,नवानगर मराठी शाळेचे मुख्याध्यापक, डॉ मनोज पाटील, घरटवाडी शाळेचे मुख्याध्यापक रमेश शिंदे, आंतरराष्ट्रीय अंजनवेल नंबर दोन शाळेचे इन्चार्ज मुख्याध्यापक महेश आंधळे, रानवी शाळेचे मुख्याध्यापक अण्णा साहेब शिंदे ,सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली.वेलदूर घरटवाडी शाळेच्या विद्यार्थ्याने आदर्श परिपाठ सादर केला.संगीत साथ नांदगावकर सर यांनी दिली.पायाभूत जीवन कौशल्य विकास याविषयी धनश्री गावित ,सीआरजी भूमिका याबाबत महेश आंधळे, मासिक पाळी व्यवस्थापन याबाबत सौ किल्लेदार व आरोग्य सेवक घारे, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन धन्वंतरी मोरे, प्रशासकीय कामाबाबत मार्गदर्शन केंद्र प्रमुख आरोही शिगवण यांनी केले.घरटवाडी शाळेमध्ये स्नेहभोजन व्यवस्था केल्याबद्दल व कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल अश्विनी घरट, समीक्षा घरट, अक्षरा घरट, मयुरी बने ,मानसी धोपट, रुणाली घरट ,सानिया धोपट यांचा केंद्रप्रमुख आरोही शिवण मॅडम यांचे हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल वेलदूर घरटवाडी शाळेचे मुख्याध्यापक रमेश शिंदे व शिक्षक वृंद मानसी जोशी, प्रभू हंबर्डे, बलशेठवार यांचा शाल व श्रीफळ देऊन केंद्रातील सर्व शिक्षक वृंदांच्या तर्फे सत्कार करण्यात आला.अष्टपैलू शिक्षक श्री प्रभू हंबर्डे व महेश आंधळे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभू हंबर्डे यांनी केले.तर आभार प्रदर्शन अण्णासाहेब शिंदे यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:36 19-07-2025














