शूटिंगदरम्यान शाहरुख खान जखमी, तातडीने अमेरिकेला हलवलं

Shahrukh Khan injured during movie shooting : बॉलिवूडचा किंगखान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान एका सिनेमाच्या शूटिंगवेळी जखमी झालाय. सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरुख खानला मल्टिपल मसल इंज्युरी झाल्यात.

त्यामुळे उपचारांसाठी किंगखानला अमेरिकेला हलवण्यात आलंय. शाहरुख मुंबईतील गोल्डन टोबॅगो स्टुडिओमध्ये शूटिंग सुरु असताना जखमी झालाय. शाहरुखला गंभीर इजा झाली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून अमेरिकेला नेल्यात आलंय. त्यामुळे सिनेमाची शूटिंग दोन महिने पुढे ढकलण्यात आलीये. सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली सुरु असलेल्या सिनेमाचं शूटिंग आता दोन महिने पुढे ढकलण्यात आलंय.

शूटिंगदरम्यान शाहरुख खान जखमी

प्रोडक्शनशी संबंधित एका जवळच्या सूत्राने माहिती दिली की, ‘शाहरुख खान यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही, फक्त स्नायूंना ताण आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये स्टंट करताना त्यांना अनेकदा दुखापती झाल्या आहेत.’ शाहरुखच्या टीमने खबरदारीचा उपाय म्हणून परदेशात उपचार घेण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून त्यांना उत्तम उपचार मिळू शकतील.

‘किंग’ची शूटिंग थांबवण्यात आली

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी शाहरुख खान यांना किमान एक महिन्याचा संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ‘किंग’ चित्रपटाचे शूटिंग सध्या थांबवण्यात आले आहे. फिल्म सिटी, गोल्डन टोबॅको आणि वायआरएफ स्टुडिओ यांसारख्या लोकेशन्स जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी बुक करण्यात आल्या होत्या, पण आता पुढील सूचनेपर्यंत त्या बुकिंग्स रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील शूटिंग सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

‘किंग’ विषयी माहिती जाणून घ्या

शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘किंग’ या चित्रपटात अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, दीपिका पादुकोण, अरशद वारसी, अभय वर्मा, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, राघव जुयाल, जयदीप अहलावत, सौरभ शुक्ला आणि सुहाना खान यांसारखे अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट गांधी जयंती 2026 रोजी प्रदर्शित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर सध्या तो आपल्या पुढच्या चित्रपट ‘किंग’च्या तयारीत व्यस्त आहेत, ज्यामध्ये त्यांची मुलगी सुहाना खानसुद्धा झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. याशिवाय शाहरुख ‘पठाण 2’ आणि ‘टायगर वर्सेस पठाण’ या यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील आगामी चित्रपटांचाही भाग असणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:48 19-07-2025