दापोलीत माकडाच्या हल्ल्यात वृद्ध जखमी

दापोली : दापोली तालुक्यातील सारंग येथील गोपीनाथ कांबळे (वय ६०) यांच्यावर माकडाने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे. त्यांना उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोपीनाथ कांबळे हे सकाळी फेरफटका मारण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. त्यावेळी अचानक त्यांच्यावर माकडाने हल्ला करून त्यांना रक्तबंबाळ केले. त्यांनी मदतीसाठी हाका मारताच जवळच असलेल्या नागरिकांनी त्यांना उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सारंग मोहल्ला येथील भारदे यांना ही घटना समजतात त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेऊन सर्व उपचार पूर्ण झाल्यावर कांबळे यांना घरी सोडण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 21/Jul/2025