रांगोळीकार विलास रहाटे यांच्या रांगोळीला प्रथम पारितोषिक

साखरपा : श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचालित वेरळ येथील इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे नवव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत देवरुख येथील विश्व विक्रमकर्ते रांगोळीकार विलास रहाटे यांच्या रांगोळीला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे.

मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात भाषेच्या दर्जाच्या निमित्ताने रहाटे यांनी ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांची रांगोळी काढली होती. ३ बाय ३ फूट आकाराच्या या रांगोळीला परीक्षकांप्रमाणेच रसिकांचीही मोठी पसंती मिळाली. विलास रहाटे यांना सात हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 21/Jul/2025