आंतराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त तटरक्षक दलाच्या कार्यालयात कार्यक्रम

रत्नागिरी : येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जागतिक आंतराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त रत्नागिरीतील भारतीय तटरक्षक दलाच्या (कोस्ट गार्ड) कार्यालयात आयोजित कार्यक्रमावेळी पॉश अॅक्ट म्हणजेच कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रबंधक कायदा, २०१३ या विषयावर सखोल माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. आर. पाटील, टी. एन. उपाध्याय, शैलेश गुप्ता, जे. एस. ढिल्लोन, अमित अनंत शिरगांवकर यांच्यासह कोस्ट गार्डचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी आंतरराष्ट्रीय न्याय दिनाचे महत्व सांगितले. तसेच पॉश अॅक्ट २०१३ या कायद्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर अॅड. अमित शिरगांवकर यांनीही मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 21/Jul/2025