झोळंबे येथे आढळला दुर्मीळ उडणारा बेडूक!

दोडामार्ग ः झोळंबे येथे दुर्मीळ ‘उडणारा बेडूक’ आढळून आला आहे. याला वैज्ञानिक भाषेत ‘मलबार ग्लायडिंग फ्रॉग’ म्हणून ओळखले जाते. शुक्रवारी रात्री झोळंबे गावातील बागायत परिसरात ओंकार गावडे, विकास कुलकर्णी आणि सुजय गावडे यांना हा बेडूक आढळून आला. मागील आठवड्यात या परिसरात बाँबे सिसिलियन (देव गांडूळ) आढळला होता. त्यामुळे या परिसरातील जैव विविधतेत भर पडली आहे.

महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सापडणारा हा अनोखा बेडूक आहे. हा बेडूक उभयचर असून वर्षातील जवळपास 8 महिने निद्रावस्थेत घालवतो. मात्र, मान्सून सुरू झाल्यानंतर या बेडकाची प्रजाती जागृत होतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 21-07-2025