रत्नागिरी : शहराजवळील महर्षी कर्वे महिला महाविद्यालयातील बीसीए या पदवी अभ्यासक्रमाचा शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा अंतिम निकाल ९८ टक्के लागला आहे.
यावर्षी महाविद्यालयाच्या बीसीए विभागातील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले असून, महाविद्यालयाचा यशाचा आलेख उंचावला आहे.
मंजिरी कांबळे हिने ७९.४० टक्के गुण मिळवून प्रथम, समीक्षा चंदरकरने ७७.६० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर ममता जाधवने गुण ७७ टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. महाविद्यालयातील १५ विद्यार्थिनींना विशेष श्रेणी, ३२ विद्यार्थिनींना प्रथम श्रेणी आणि ९ विद्यार्थिनींना द्वितीय श्रेणी मिळाली. बीसीए हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून, एसएनडीटी महिला विद्यापीठाशी संलग्न आहे. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थिनींना आधुनिक संगणक ज्ञान, तांत्रिक कौशल्य व सॉफ्टवेअर क्षेत्रातील व्यावसायिक गरजांसाठी तयार करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 21-07-2025













