Breaking : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा

Jagdeep Dhankhar Resigns As Vice President : देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Vice President jagdeep Dhankhar Resigns ) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव धनखड यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.

जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांना पत्र लिहलं आहे. या पत्रात धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व मंत्र्यांचे आभार मानले आहेत. धनखड यांना दिलेल्या वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे.

संसदेच्या सर्व सदस्यांकडून मला मिळालेले प्रेम आणि विश्वास नेहमीच माझ्या आठवणीत राहील

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाता राजीनामा दिला आहे. दरम्यान, अचानक जगदीप धनखड यांना राजीनामा दिल्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत. संसदेच्या सर्व सदस्यांकडून मला मिळालेले प्रेम आणि विश्वास नेहमीच माझ्या आठवणीत राहील. देशाच्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला अनेक अनुभव मिळाले यासाठी मी मनापासून आभारी आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आणि अभूतपूर्व विकासाचे साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी असणे ही समाधानाची बाब आहे असे धनखड म्हणाले. या परिवर्तनकारी युगात देशाची सेवा करणे माझ्यासाठी खास सन्मान आहे. हे पद सोडताना, भारताचा जागतिक पातळीवर झालेल्या उदयाचा आणि देशाच्या अभूतपूर्व कामगिरीचा मला अभिमान आहे. भारताचे भविष्य उज्ज्वल असेल असा मला विश्वास आहे. मी मनापासून आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो असे धनखड यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या म्हटलं आहे.

मार्च महिन्यात जगदीप धनखड यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते

मार्च महिन्यात जगदीप धनखड यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. हृदयाशी संबधीत इन्फेक्शन झाल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रुग्णालयात जाऊन जगदीप धनखड यांची भेट घेतली होती. दरम्यान, आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनखड यांनी राजीनामा दिला आहे. 11 ऑगस्ट 2022 रोजी जगदीप धनखड यांनी देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 22-07-2025