कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेत दीप अमावस्येच्या दिवशी रंगणार टिपऱ्या आणि भोवत्यांचा कार्यक्रम

रत्नागिरी : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे यंदा दीप अमावस्येच्या दिवशी श्री यशवंत हरी गोखले सभागृहात श्रावण मासारंभ निमित्ताने टिपऱ्या आणि भोवत्यांचा कार्यक्रम दि. २४ जुलै रोजी संध्या. ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे, तसेच या वेळी विविध आणि आकर्षक दिव्यांची आरास देखील केली जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध अश्या को का को ला ग्रुप लांजा यांच्या वतीने टिपऱ्या आणि भोवत्यांचे बहारदार नृत्य सादर करण्यात येणार असुन समस्त रत्नागिरी करांनी सदरचा कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी, साळवी स्टॉप- नाचणे लिंक रोड , हवामान खात्या समोरील, श्री यशवंत हरी गोखले भवन येथे उपस्थित रहावे असे आवाहन कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभे मार्फत करण्यात आले आहे.

कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेचे गोखले भवन नवीन सर्व सोयीनी युक्त सुसज्ज असे सभागृह आता तयार झाले असुन, याचा वापर नाचणे, काजरघाटी, मिरजोळे, कुवारबाव, खेडशी ,व सर्व रत्नागिरीकरांनी घ्यावा असे आवाहन तसेच मुद्दामहून बघण्या साठी निमंत्रित सभेमार्फत केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 22-07-2025