गुहागर तालुक्यातील गावांचा डोंगरी क्षेत्रात समावेश

गुहागर : डोंगरी विकास कार्यक्रमामध्ये सह्याद्रीला लागून असलेले तालुके आजवर घेतले जात होते. परंतु अलीकडच्या काळात अन्य तालुक्यातील डोंगरी क्षेत्र समाविष्ट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

शासनाच्या नव्या धोरणाप्रमाणे गुहागर तालुक्यातील सुमारे ६० गावे डोंगरी विकास कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. डोंगरी विकास कार्यक्रमामध्ये रस्ते व दळणवळणासाठी अन्य सुविधा उभारता याव्यात म्हणून शासनाचा भरीव निधी दरवर्षी खर्च पडत असतो. केंद्र व राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद केलेली असते, विकाससाठी अन्य क्षेत्रापेक्षा जादाचा निधी या क्षेत्रांना मिळत असल्याने सार्वजनिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारणी शक्य होते.

यापूर्वी रत्नाागिरी जिल्ह्यातील सह्याद्रीला लागून असलेले तालुके डोंगरी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले होते. आता सह्याद्रीला लागून नसलेले परंतु डोंगराळ भाग डोंगरी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यात भर घालून नवीन यादी राज्य सरकारने नुकतीच प्रसिद्ध केली आहे.

शासन निर्णयाप्रमाणे गुहागर तालुक्यातील रोहिले, तळ्याची वाडी तर्फे पालपेणे, चिखली, पाटपन्हाळे, उमराठ, तवसाळ, साखरी आगार, निवोशी, कीर्तनवाडी तर्फे गुहागर, वेळणेश्वर, साखरी बुद्रुक, शृंगारतळी, पोमेंडी, कोंडवाडी तर्फे पाटपन्हाळे, वाघांबे, जानवळे, घाडेवाडी तर्फे वेळंब, देवघर, घरटवाडी तर्फे वेलदूर, वरचापाट तर्फे गुहागर, मुसलोंडी, गीमवी, जामसूत, मुंढर, पिपर, रामाणेवाडी तर्फे कौंढर काळसूर, गुहागर, नागझरी, निगुंडळ, पडवे, नवानगर, कातळवाडी तर्फे अंजनवेल, वाडदई, मढाळ, नरवण, साखरी खुर्द, उमराठ खुर्द, मोहल्लावाडी म्हसकरवाडी तर्फ साखरी त्रिशुळ, खामशेत, असगोली, बारभाई, मौजे अंजनवेल, पालशेत, तेटले, तवसाळवाडी, मारुती मंदिरवाडी, दोडवली, पारदळेवाडी, मळण, कर्दे, कावणकरवाडी, मासु, जांभारी खुर्द या गावांचा समावेश डोंगरी गावांच्या या यादीत करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 22/Jul/2025