रेल्वे प्रवासात झोपेचा गैरफायदा घेत मोबाईलची चोरी

चिपळूण : कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या ठाण्यातील एका प्रवाशाचा रत्नागिरी ते चिपळूणदरम्यान मोबाईल चोरीला गेला. १९ जुलैला दुपारी दोन ते सायंकाळी सहाच्यादरम्यान हा गुन्हा घडला. ठाण्यातील विशाल कांबळे (वय ३५) हे १९ जुलैला जनशताब्दी एक्स्प्रेसने रत्नागिरी ते चिपळूण प्रवास करत असताना ते आरक्षित डब्यात झोपले होते.

त्यांच्या झोपेचा गैरफायदा घेत संशयित आरोपीने १६ हजार रुपये किमतीचा त्यांचा मोबाईल चोरला. कांबळे यांनी या संदर्भात ठाणे येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर चौकशीसाठी चिपळूण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 22/Jul/2025