चिपळूण : तालुक्यात खेर्डी एमआयडीसी कराड हायवेवरील वाशिष्ठी डेअरीसमोर १९ जुलैला सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास एका भरधाव ट्रकने विजेच्या खांबाला धडक दिली. या अपघातात खांबाचे आणि ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे.
एमआयडीसी खेर्डी येथील वाशिष्ठी डेअरीसमोर ट्रक भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे चालवत विक्रम सुनील घुले (वय २५, रा. टाकळी, ता. केज, जि. बीड) याने विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली. या घटनेची तक्रार किरण विश्वनाथ गवळी (वय २७, रा. खेर्डी, एमआयडीसी कॉलनी) यांनी चिपळूण पोलिसांत दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार विक्रम घुले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 22/Jul/2025














