खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांना गॅसपुरवठा करण्यासाठी अंतर्गत रस्त्यांच्या खोदलेल्या बाजूपट्ट्या अपघाताला कारणीभूत ठरत असून, अनेक वाहनांचे नुकसान होत आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखान्यांना गॅसपुरवठा करण्यासाठी मार्च, एप्रिल महिन्यांत अंतर्गत रस्त्यांच्या कडेने पाइपलाइन टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली. जवळपास १२ किलोमीटरच्या परिसरात ही खोदाई करण्यात आली; मात्र, ती करताना औद्योगिक विकास महामंडळाची परवानगी घेतली होती की नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे. याबाबत चिपळूणच्या खेर्डी येथील कार्यालयाकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही.
मंगळवारी दुपारी एक वाजता येथील ए. बी. मौरी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बाराचाकी भरलेला कंटेनर रुतला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळवली गेली होती. मागील महिन्यातही हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपनीसमोरही एक ट्रक रुतला होता. या भागातील संपूर्ण रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्याबाबत अनेकदा ओरड होऊनही औद्योगिक विकास महामंडळ दुर्लक्ष करत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 22/Jul/2025














