रत्नागिरी : फाटक हायस्कूलमध्ये व्हॉलिबॉल पंच प्रशिक्षण

रत्नागिरी : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व रत्नागिरी जिल्हा व्हॉलिबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने फाटक हायस्कूलमध्ये पंच प्रशिक्षण व पंच परीक्षा आयोजित करण्यात आली. प्रशिक्षणाचे उ‌द्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी जिल्हा व्हॉलिबॉल प्रशिक्षक गणेश खैरमोडे, खो-खो प्रशिक्षिका ऐश्वर्या सावंत, जिल्हा वेटलिफ्टिंग प्रशिक्षक गणेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. व्हॉलिबॉल पंच परीक्षेसाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने खेळाडू, पंच आणि क्रीडाशिक्षक आले होते.

असोसिएशनच्यावतीने प्रफुल्ल वायंगणकर, गौरांग कुर्ते यांनी सहकार्य केले. व्हॉलिबॉल पंच प्रशिक्षणार्थीना फाटक हायस्कूलचे क्रीडाशिक्षक मंदार सावंत, मिस्त्री हायस्कूलचे क्रीडाशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू सैफन चरके आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पहिल्या राज्यस्तरीय पंच परीक्षा उत्तीर्ण योगीता धुळप यांनी मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 22/Jul/2025