वरवडे बौद्धवाडी येथे आज वर्षावास कार्यक्रमाची सांगता

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील वरवडे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ३० व आदर्श महिला मंडळ ग्रामीण व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. १७ रोजी वर्षावास सांगता कार्यक्रम शाखाध्यक्ष कुलदीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

सायंकाळी ७.०० वाजता धार्मिक पूजापाठ, ७.३० वाजता धार्मिक प्रवचन, ८.३० वाजता स्नेहभोजन, रात्री १०.०० वाजता विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांना वरवडे परिसरातील धम्म बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वरवडे शाखा उपाध्यक्ष विनोद मोहिते, सचिव रणजित जाधव यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 17-10-2024