संगमेश्वर : सांगवे फौजदारवाडी येथील वृक्ष ठरतोय धोकादायक

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाने-तुळसणी मार्गावर सांगवे फौजदारवाडी येथील सप्तलिंगी पुलानजिकच्या रस्त्यालगतचा उंच असलेला वृक्ष सध्या धोकादायक बनला आहे. संबंधित विभागाकडून हे झाड तोडण्यात यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थ व प्रवासीवर्गातून होत आहे.

या मार्गांवरून लहान-मोठ्या वाहनांची तसेच विद्यार्थी, कामगार व ग्रामस्थ यांची सतत ये-जा सुरु असते. हे वृक्ष ज्या ठिकाणी आहे. त्याच्या एका बाजूला रहदारीचा रस्ता आहे व दुसऱ्या बाजूला महावितरणची विद्युत वाहिनी आहे. त्यामुळे हे झाड दोन्ही बाजूनी धोक्याचे बनले आहे.

या धोक्याबाबत गावचे माजी सरपंच देवदत्त शेलार यांनी महावितरण कार्यालयाला कल्पना दिली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच संबंधित बांधकाम विभागानेही याकडे लक्ष घालून हे झाड तोडण्याची मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 22/Jul/2025