चिपळूण : सध्या महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब यांसारख्या सोशल माध्यमातून नको ते व्हिडीओ, मेसेज पाहण्याचे प्रमाण वाढले आहे त्याचा परिणाम म्हणजे त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत जाऊन त्या अत्याचाराला बळी पडत आहेत. याला वेळीच आवर घालण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा वापर योग्य तो प्रकारेच करावा. यासाठी विद्यार्थिनी पालक व महिला यांच्यामध्ये जनजागृती होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश, चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यावतीने सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे येथे’ सक्षम तू’ हे अभियान घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या अभियानाची सुरुवात स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने आणि अॅड. स्मिता पाटील यांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्षा पूजा निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अॅड. स्मिता कदम या महिलांमध्ये कायदेविषयक जनजागृती संदर्भात मार्गदर्शन केले.
त्या म्हणाल्या, महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि शोषणास प्रतिबंध घालण्यासाठी महिलांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी महिलांनी कायदे व त्यांचे हक्क यांची माहिती आत्मसात केली पाहिजे.
आपल्या प्रास्ताविकेमध्ये सौ. पूजा निकम म्हणाल्या, समाज माध्यमांचा गैरवापर केल्याने दिवसेंदिवस महिलांवरील अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. हे थांबविण्यासाठी त्यांच्यात महिला सक्षमीकरणाचे असे अनेक नवनवीन उपक्रम राबवण्याची नितांत आवश्यकता आहे. या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य श्री. कांबळे, कॉन्स्टेबल रेखा कदम, प्रा. पूनम भोसले, प्रिया विचारे, अरुणा घाडगे, सानिका भुवड, पूर्वा सुर्वे याबरोबरच उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी सूत्रसंचालन डॉ. दीप्ती शेंबेकर यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 22/Jul/2025














