रत्नागिरी : येथील नगररचनाकार संवर्गातील अधिकारी श्रीकांत प्रभुणे यांची बढतीने बदली झाली आहे. पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण या ठिकाणी सहायक संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.
नगररचनाकार म्हणून त्यांनी रत्नागिरीत तीन वर्षे काम केले. अधिकारी म्हणून कर्मचाऱ्यांना चांगली वागणुक देत चाखोरीबद्ध काम केले. श्रीकांत प्रभुणे हे सहायक नगररचनाकार म्हणून यापूर्वी होते. त्यानंतर त्यांची नगररचनाकार म्हणून नियुक्ती झाली. तीन वर्षांमध्ये त्यांनी या पदाला साजेसे काम केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी उत्तम कामाची छाप सोडली. जिल्ह्याची धुरा सांभाळात कामाचा गतिमान निपटारा केला. जनतेच्या कामाला त्यांनी नेहमी प्राधान्य दिले. कोणाशीही वैर न घेता कामाला महत्त्व दिले. तीन वर्षांमध्ये त्यांनी अधिकाराचा योग्य वापरण करून कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कार्यालयाचा उत्तम गाडा हाकला. त्यांच्या कामाची दखल घेत शासनाने त्यांना बढती दिली असून पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण या ठिकाणी सहायक संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 17-10-2024









