देवरुख येथे २५ जुलै रोजी रक्तदान शिबिर

देवरुख : रत्नागिरी रक्तपेढी शासकीय रग्णालय, आयसीटीसी विभाग ग्रामीण रुग्णालय देवरुख, स्वयंपूर्तता फाऊंडेशन रत्नागिरी व श्रमिक कृषी संवर्धन संस्था चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलै रोजी देवरुख येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

देवरुख शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत हे शिबीर होणार आहे. या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी भाग घेउन रक्तदानाच्या पवित्र कामाला सहकार्य करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, वैशाली पुजारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 22/Jul/2025