गुहागर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक २३ रोजी भाजपा गुहागर तालुक्याच्या वतीने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत गुहागर ग्रामीण रूग्णालय येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य प्रदेशकडून राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये रक्तदान शिबीर आयोजन करण्यात येत असून भाजपा गुहागर तालुका वतीने आयोजित रक्तदान शिबीरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून हे शिबीर यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:10 22-07-2025














