राजापूर : गेल्या अनेक वर्षापासून नादुरुस्त असलेल्या पाचल येथील शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पाचल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि राजापूर तालुका अखंड वारकरी संप्रदायाचे माजी अध्यक्ष अण्णा पाथरे आणि सहकाऱ्यांनी या कामाची पाहणी केली.
वर्षानुवर्षे नादुरुस्त असलेल्या इमारतीची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी श्री. पाथरे यांनी आमदार किरण सामंत यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती.
लोकांच्या संपर्काच्यादृष्टीने विश्रामगृहाचे असलेले महत्त्व विषद करून श्री. पाथरे यांनी आमदार श्री. सामंत यांच्याकडे इमारत दुरुस्तीसाठी निधी मिळण्याची मागणी केली होती. त्याची तत्काळ दखल घेत श्री. सामंत यांनी विश्रामगृहाच्या इमारतीची दुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:56 PM 22/Jul/2025














