चिपळूण : सती-चिंचघरी येथील महाविद्यालयात आयोजित आपत्तीपूर्व तयारी प्रशिक्षण कार्यक्रमात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या (एनडीआरएफ) जवानांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक संजय गणपतराव वरेकर यांनी एनडीआरएफच्या जवानांचे स्वागत केले. यावेळी कमांडर प्रमोद राय यांनी आपत्तीपूर्व
तयारीचे महत्त्व पटवून दिले.
गावातील नागरिकांनी आणि ६५० विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक उपचार, बचाव कार्य, सुरक्षितस्थळी स्थलांतर, अग्निशमन उपाययोजना, जलतरण साहाय्य, इमारतींच्या दुर्घटना यासंबंधीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक एनडीआरएफ पथकाने सादर केले. यावेळी प्राध्यापक सतीश पालकर, संतोष हतनकर, महेश सावंत, एम. जी. यादव, श्वेता चव्हाण, आनंद भुवड आदी शिक्षक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:09 PM 22/Jul/2025














