रत्नागिरी : समाजसेवक विनेशभाऊ मोहिते यांच्या सामाजिक विकास ग्रुपकडून ३५६० राख्या सीमावर्ती भागातील जवानांसाठी रवाना करण्यात आल्या. देशाच्या सीमांवर रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्षाबंधनाच्या निमित्ताने चिपळूण तालुक्यातील विविध गावांतून आणि शाळांमधून ३५६० राख्या पाठवण्यात आल्या.
हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांच्या सामाजिक विकास ग्रुपतर्फे राबविण्यात आला.
देशसेवेसाठी योगदान करणाऱ्या जवानांना रक्षाबंधनाचा सण साजरा करता यावा या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ही राखी मोहीम चिपळूण तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या तिवडी, आकले, खडपोली, मिरजोळी आणि चिपळूण शहरातील शाळा व ग्रामपंचायतींच्या सहकार्याने राबविण्यात आली. बचत गट कार्यालय तिवडी, ग्रामपंचायत आकले, छत्रपती शिवाजी महाराज सभागृह खडपोली, न्यू इंग्लिश स्कूल खडपोली, युनायटेड स्कूल चिपळूण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजोळी या ठिकाणी राख्या जमा करून देशभरातील सीमांवर पाठवण्यात आल्या. या उपक्रमात अंगणवाड्यांमधील बालकांपासून ते ग्रामीण भागातील भगिनी, विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामसेवक, सरपंच, बचत गट, शाळा आणि महाविद्यालये यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विशेषतः महिलांनी मोठ्या प्रमाणावर उत्साहाने राख्या तयार केल्या. उपक्रमात सहभागी महिलांना २०० अभिनंदन पत्रके देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी सैनिक संभाजी चव्हाण, विद्यमान सैनिक इकबाल चिपळूणकर, साद कडवेकर, राजेश कोकरे, तसेच प्रसाद वनगे, सुधीर मोरे, नितीन शिगवण, हेमंत जाधव, वैभव मोहिते, सचिन पवार, समीर कदम, अनिल पिनगे, विवेक जाधव, आकाश मोहिते, राहुल मोरे, राहुल कदम, राजेश यादव आदींनी समर्पित सेवा दिली. पंचशील अध्यक्ष विशाल मोहिते यांनी विशेष समन्वय साधला. कार्यक्रमात तिवडी शाळेचे मुख्याध्यापक विजय वाघमोडे, अंगणवाडी सेविका शीतल नरळकर, आकले सरपंच सुमित्रा कांगणे, खडपोली सरपंच सारिका भुवड, न्यू इंग्लिश स्कूल खडपोलीच्या मुख्याध्यापिका वीणा चव्हाण, युनायटेड स्कूलचे विभाकर वाचासिद्ध व संगीता नाईक, जि.प.शाळा मिरजोळीच्या मुख्याध्यापिका मनीषा गर्जे, तसेच गुहागर, पोफळी, वालोटी, जानवळे, पालपेणे येथील अनेक शाळांचे शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:03 22-07-2025














