दिवाळी खरेदीची चिंता मिटली! रत्नागिरी खबरदारतर्फे ‘दिवाळी शॉपिंग फेस्ट’चे भव्य आयोजन!

रत्नागिरी, (दि. २२ जुलै २०२५) : रत्नागिरीतील सर्वात मोठे व्यावसायिक प्रदर्शन ‘वुमेन्स कार्निव्हल’ आयोजित करणारे रत्नागिरी खबरदार या कोकणातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून यावर्षी दिवाळीपूर्वी गृहिणी आणि ग्राहकांसाठी एक खास भेट घेऊन येत आहे! उद्योजक महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि दिवाळीच्या सर्व खरेदीसाठी एकच छत उपलब्ध करून देण्यासाठी ९ ते १२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत जयेश मंगल पार्क, रत्नागिरी येथे भव्य ‘दिवाळी शॉपिंग फेस्ट’चे आयोजन करण्यात येणार आहे.


उद्योजिका महिलांना नवा मंच

दरवर्षी ‘वुमेन्स कार्निव्हल’च्या माध्यमातून हजारो उद्योजक महिलांना आपले उत्पादन आणि व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक मोठा मंच उपलब्ध करून देणाऱ्या रत्नागिरी खबरदारने, अनेक उद्योजिकांच्या आग्रहास्तव यावर्षीपासून ‘दिवाळी शॉपिंग फेस्ट’ची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिला उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाला आणखी चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.


एकाच छताखाली दिवाळीची संपूर्ण खरेदी

या ‘दिवाळी शॉपिंग फेस्ट’मध्ये ग्राहकांना दिवाळीसाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तूंची खरेदी एकाच ठिकाणी करण्याची अनोखी संधी मिळणार आहे. यामध्ये कपड्यांपासून ते दिवाळीच्या फराळापर्यंत, सजावटीच्या वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक उपकरणांपर्यंत, विविध प्रकारच्या उत्पादनांची आकर्षक व्हरायटी उपलब्ध असेल.

प्रदर्शनात उपलब्ध होणाऱ्या प्रमुख वस्तू:

  • सजावट साहित्य: विविध रंगांचे व डिझाईन्सचे आकाशकंदील, मातीच्या व पितळी पणत्या, मेणबत्त्या, तयार रांगोळी स्टिकर्स, रांगोळीचे रंग, तोरणे, आकर्षक पडदे, शोभेची भांडी, फुले.
  • दिवाळी फराळ व खाद्यपदार्थ: दिवाळी फराळ, मिठाई, सुकामेवा, चॉकलेट्सचे पॅक, दिवाळी स्पेशल नमकीन.
  • फॅशन आणि कपडे: पैठणी, कांजीवरम, सिल्क साड्या, लेहेंगा, कुर्ता-पायजामा, डिझायनर कुर्ती, वेस्टर्न-एथनिक फ्यूजन वेअर, लहान मुलांचे दिवाळी स्पेशल कपडे, पारंपरिक चप्पल आणि शूज.
  • दागिने व ॲक्सेसरीज: सोने-चांदीचे दागिने, इमिटेशन ज्वेलरी, पर्स, हँडबॅग, घड्याळे.
  • गृहपयोगी वस्तू: सोफ्यासाठी कव्हर्स, बेडशीट्स, डिनर सेट्स, किचन गॅजेट्स, स्टीलची भांडी.
  • इलेक्ट्रॉनिक वस्तू: मोबाईल फोन, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सर, ग्राइंडर, ओव्हन, होम थिएटर, लहान इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स.
  • पूजा साहित्य: लक्ष्मी-गणेश मूर्ती, पूजा थाळ्या, धूप, अगरबत्ती, कापूर, कुंकू, हळद, चंदन.
  • गिफ्ट पॅक्स: विविध प्रकारचे आकर्षक गिफ्ट पॅक्स.

रत्नागिरी खबरदारचे संपादक हेमंत वणजु यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रदर्शनासाठी स्टॉल बुकिंग सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी सज्ज होण्याआधी, या भव्य शॉपिंग फेस्टला भेट देण्यासाठी तयारी करा!