रत्नागिरी : संजय यादवराव यांची स्वतंत्र उमेदवारीची घोषणा, राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार

रत्नागिरी : दहा वर्षांपूर्वी २०१४ ची निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर लढवणारे संजय यादवराव पुन्हा निवडणुक रिंगणात उतरणार आहेत. समृद्ध कोकण संघटनेअंतर्गत स्वायत्त कोकण समितीच्या माध्यमातून ते राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी राजापूर येथे केली आहे.

सन २०१४ च्या निवडणुकीत श्री. यादवराव यांना सुमारे दहा हजार मते मिळाली होती. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने राजापूर विधानसभा मतदारसंघातून प्रथमच उमेदवारी देऊन मतदारसंघासाठी पूर्ण नवा चेहरा संजय यादवराव यांच्या रूपाने दिला होता. त्यानंतर २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने युतीमुळे हा मतदारसंघ मित्रपक्ष शिवसेनेला सोडला होता. तेव्हापासून या मतदारसंघात समृद्ध कोकण संघटनेच्या माध्यमातून श्री. यादवराव पर्यटन, कृषी आणि पूरक उद्योग यावर काम करत आहेत. आंबा, काजू उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ते कार्यरत असून त्यांनी गेल्या महिन्यात भू येथून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन करून शासनाचे लक्ष कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वेधले होते .

विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याअगोदरच श्री. यादवराव यांनी राजापूरमधून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा यांनी केली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत रंगत येणार असल्याचे मानले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 17-10-2024