रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी : जिल्ह्यात मंगळवारी पावसाचा जोर कायम असून दिवसभर पावसाने उसंत घेतली नाही. जिल्ह्यात 25 जुलैपर्यंत जोरदार पावसाची शक्यता असून हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. समुद्र खवळलेला असून उंच लाटा उसळत आहेत. बुधवारी रात्रीपासून अमावस्या असल्याने या कालावधीत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस चांगलाच सक्रिय झाला आहे. शेतीच्या कामांनाही वेग आला असून लावणी जवळपास पूर्ण झाल्या आहेत. पुढील चार दिवस हवामान खात्याने किनार्‍यासह दुर्गम भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मंगळवारी दिवसभर पाऊस कोसळत होता. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात 464.35 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मंडणगडमध्ये 46.50 मि.मी., खेड 51.42 मि.मी., दापोली 54 मि.मी., चिपळूण 50 मि.मी., गुहागर 76 मि.मी., संगमेश्वर 36 मि.मी., रत्नागिरी 49.33 मि.मी., लांजा 43.60मि.मी. व राजापूर 57.50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 23-07-2025