रनपकडून लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त वक्तृत्व, गीतापठण निबंध स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त रत्नागिरी नगर परिषदेने शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, गीता पठण स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर खुल्या गटासाठी लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यलढ्यातील अग्रदूत या विषयावरील निबंध स्पर्धा आयोजित केली आहे.

या निबंधाची शब्दमर्यादा पंधराशे इतकी असून लिहिलेले निबंध नगर परिषदेच्या नागरी सुविधा केंद्रातील खिडकी क्र. ४ मध्ये जमा करायचे आहेत. शनिवार दि. २५ पर्यंत निबंध आणून देण्याची मुदत असून स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ १ ऑगस्ट रोजी होणार आहे. नगर परिषदेच्या संत गाडगेबाबा सभागृहात हा बक्षीस वितरण सोहळा सकाळी ११.३० वाजता होणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 23/Jul/2025