रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक, त्यांच्या पत्नी व पाल्य यांचा सन्मान करण्यात येणार आहे. राज्यस्तरावरील कामगिरीसाठी २५ हजार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीसाठी ५० हजार इतका गौरव निधी, प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. तरी इच्छुक माजी सैनिकांनी संबंधित कार्याबद्दलची कागदपत्रे, गुणपत्रे, सैन्य सेवा पुस्तक, ओळखपत्रांसह २० सप्टेंबरपूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे जसे खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य संगीत, गायन, नृत्य वादन इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार प्राप्त माजी सैनिक, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे माजी सैनिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये १० वी परीक्षेत ९० व १२ वी परीक्षेत ८५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण माजी सैनिक, विधवांचे पाल्य, पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल सन्मान करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय (०२३५२-२२३२१९) येथे संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 23/Jul/2025














