चिपळूण : हातभट्टीची दारू बाळगणाऱ्या महिलेवर गुन्हा

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तोंडली सावरगाववाडी येथे गावठी हातभट्टीची ७ लिटर दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या महिलेविरोधात सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.१५ वा. करण्यात आली. या बावत महिला पोलिस हेड कॉस्टेबल सारिका सावंत यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी संशयित महिला ही आपल्या घराच्या मागील बाजूस असलेल्या रानात गावठी हातभट्टीची ७५० रुपयांची ७ लिटर दारु विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 17/Oct/2024