खेड : शालेय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले लवकरात लवकर मिळावेत अशी मागणी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने मंगळवारी उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांच्याकडे करण्यात आली. यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन श्रीमती पाटील यांनी या शिष्टमंडळाला दिले.
तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने खेड तालुक्याच्या नवनिर्वाचित उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. खेड तालुक्यातील देण्यात येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले तातडीने मिळण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी खेड तालुका अध्यक्ष विनायक निकम, ज्येष्ठ नेते वसंत गुरव, ज्येष्ठ नेते कैलास यादव, अनंत कांबळे, ज्येष्ठ नेते रामचंद्र शिगवण, सामाजिक कार्यकर्ते बाबाराम पवार, सुभाष पालकर, विनोद मोहिते उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 23/Jul/2025










