पावस : रत्नागिरी तालुक्यातील निवळी-रावणंगवाडी येथे शेतकरी विष्णू रावणंग यांच्या शेतात चारसूत्री पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आले. या वेळी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. त्यामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, कृषी यांत्रिकीकरण, माती परीक्षण, पीक स्पर्धा योजनेची माहिती देण्यात आली. या वेळी साहाय्यक कृषी अधिकारी मनीषा पाटील उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 23/Jul/2025














