आजचे राशीभविष्य, २३ जुलै २०२५

मेष – आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. नवे कार्य करण्याची प्रेरणा मिळून त्याचा आरंभ सुद्धा कराल.

वृषभ – आपली अनिर्णायकी अवस्था झाल्याने हाती आलेली सोनेरी संधी आज आपण गमावून बसाल.

मिथुन – आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज दिवसाची सुरुवात प्रफुल्लित मन व स्वस्थ चित्ताने होईल.

कर्क – आज मानसिक अस्वस्थता जाणवेल. त्यामुळे आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही.

सिंह – आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. तरीही द्विधा मनःस्थितीमुळे हातची संधी जाण्याची शक्यता आहे.

कन्या – नवीन कार्यात यशस्वी होऊ शकाल. व्यापारी व नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस लाभदायी आहे.

तूळ – आज आपण बौद्धिक व लेखन कार्यात व्यस्त राहाल. आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे.

वृश्चिक – आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. शक्यतो आज नवीन कार्याची सुरुवात करु नये.

धनु – मनोरंजन, मेजवानी, सहल, प्रवास, मित्र व प्रिय व्यक्तीचा सहवास तसेच सुंदर वस्त्र लाभ हि आजच्या दिवसाचे वैशिष्ठय असेल.

मकर – आजचा दिवस व्यापार – व्यवसायातील प्रगती व आर्थिक नियोजन यासाठी अनुकूल आहे. वसुली तसेच आर्थिक देवाण- घेवाणीत यश मिळेल.

कुंभ -आजचा दिवस मानसिक अशांतता व उद्विग्नता यांनी भरलेला आहे. सातत्याने विचार बदलत राहतील त्यामुळे निर्णायकता असणार नाही.

मीन – आज दक्षता बाळगण्याची गरज आहे. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आईची प्रकृती हा चिंतेचा विषय होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 23-07-2025