पावस : पावस परिसरातील रस्त्यावर मोकाट जनावरांमुळे वाहतुकीत अडथळे येत आहेत. जनावरे पाळणे परवडत नसल्याने अनेकांनी आपली जनावरे मोकाट सोडली आहेत. ही जनावरे रस्त्यावर ठिय्या देत असल्याने वाहनचालकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
पावस पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील रस्त्यावर, पावस बाजारपेठेसह पावस बसस्थानकाबाहेरील रस्त्यावर मोठ्या संख्येने मोकाट जनावरे बसलेली असतात. रात्री वाहनांच्या उजेडात ही जनावरे दिसत नसल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे जनावरांच्या मालकाचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. नाखरे येथे ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये ठराव करून मोकाट सोडणाऱ्या जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याचा ठराव केला
हा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनला असून, परिसर अपघातक्षेत्र बनला आहे. या हद्दीमध्ये कोंडवाडा नसल्यामुळे या ठिकाणी ही समस्या दिवसेंदिवस वाढत असून, जनावरांच्या मालकांना याची कोणती चिंता नसल्याने त्यांच्यावर आळा घालण्यासाठी ग्रामसभेमध्ये प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत. त्यामध्ये संबंधित मालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात येणार आहे-प्रवीण शिंदे, उपसरपंच, पावस
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 23/Jul/2025














