खेड : खेड शहरात वृक्ष लागवडीसह संगोपन उपक्रमासाठी नगरपालिकेने १५ जूनपासून मोहीम हाती घेतली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत वनमहोत्सव उपक्रम राबवण्यात येणार आहे.
या उपक्रमात शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वयंस्फूर्तीन सहभाग नोंदवून वृक्ष लागवड आणि संगोपन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी केले आहे. पालिका हद्दीतील मोकळ्या जागा, उद्याने, आरक्षित क्षेत्रे, रस्त्याच्या दुतर्फा, नदीकिनारी, राखीव क्षेत्रे, स्मशानभूमी, शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणी वृक्ष लागवड आणि संगोपन करण्याचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात शहरातील शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, महिला बचतगट यांचा सहभाग निश्चित करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 23-07-2025














