संगमेश्वर : नावडी ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवडणूक गटाच्या नव्या नामकरणाविरोधात हरकत सादर केली आहे. या हरकतीत नावडी गावाला पूर्वीप्रमाणे नावडी गट हेच नाव देण्याची मागणी केली आहे.
नावडी व रामपेठ ही एकच ग्रामपंचायत असून, महसूल विभागातील तांत्रिक विभागणीमुळे दोन्ही गावे वेगवेगळी दाखवली गेली आहेत. नावडीची लोकसंख्या ३५०० पेक्षा अधिक असूनदेखील ती कमी दाखवण्यात येत आहे, असे म्हणणे हरकतीत मांडण्यात आले आहे. नवीन विभागणीनुसार नावडी गटाला मुचरी जिल्हा परिषद गट असे नामकरण करण्यात आले आहे. त्या गटातच नावडी तसेच संबंधित सर्व गावे येत होती. नावडी हे गाव भौगोलिकदृष्ट्या अत्यंत सोयीचे आणि देवाणघेवाणीचे केंद्र आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 23/Jul/2025














