रत्नागिरी : मंडणगड चौक येथे मद्यधुंद व्यक्तीवर गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील मंडणगड चौक येथे मद्यधुंद अवस्थेत आढळून आलेल्या प्रौढाविरोधात मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १५ ऑक्टोबर रोजी ७.४५ वा. सुमारास करण्यात आली. राजकुमार जगेश्वर प्रसाद मेहता (४२) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस शिपाई दत्तात्रय शिवाजी पिसाळ यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी संशयित हा मंडणगड चौक येथील सरकार मान्य देशी दारु दुकानाच्या बाहेर मद्यधुंद अवस्थेत आढळला होता. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 17/Oct/2024