खेड : तालुक्यातील खोपी- ढेबेवाडी येथे लागलेल्या आगीत तीन घरे खाक होऊन कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले होते. या तिन्ही कुटुंबांना धर्मादाय निधीतून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील शाखेने आर्थिक मदतीचा हात दिला. दोन महिन्यांपूर्वी रंजना ढेबे, लक्ष्मी ढेबे, पार्वती ढेबे यांची घरे जळून भस्मसात झाली होती.
या तिन्ही कुटुंबीयांनी जिल्हा बँकेकडे आर्थिक मदतीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, संचालक दिनकर मोहिते यांच्या हस्ते तिन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. या वेळी बँकेचे सरव्यवस्थापक सुनील निकम, सुनील शिर्के उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:02 PM 23/Jul/2025














