मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी प्रभाग ६ मध्ये शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप

रत्नागिरी : रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक ६ मधील दामले विद्यालयासमोर असलेल्या जोगळेकर हॉल, मारुती मंदिर येथे जय हो प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, निलेश महादेव आखाडे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक ६ मधील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास शेकडो विद्यार्थी आणि प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

जय हो प्रतिष्ठान आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच आयटी जिल्हाप्रमुख निलेश आखाडे यांच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष दादा ढेकणे, जय हो प्रतिष्ठानचे प्रमुख राजू भाटलेकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे, आणि युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र पटवर्धन यांनी केले. त्यांनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. निलेश आखाडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत, जय हो प्रतिष्ठानने केलेली मदत, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मिळालेल्या वह्या आणि स्वतःकडून दिलेल्या शैक्षणिक साहित्याची माहिती दिली. तसेच, यापुढेही प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी काम करत राहण्याची ग्वाही देत ‘तुम्ही कधीही हाक मारा, तुमचा निलेश दादा तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध असेल!’ असा विश्वास उपस्थितांना दिला. यानंतर जय हो प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू भाटकर यांनी जय हो प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याची माहिती दिली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश आखाडे यांनी केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांनी आणि शेकडो विद्यार्थ्यांनी या मोफत शैक्षणिक व गणवेश वाटपाचा मोठ्या उत्साहात लाभ घेतला.
यावेळी रत्नागिरी शहर अध्यक्ष दादा ढेकणे, राजू भाटलेकर, मनोज पाटणकर, सौ. कांचन मुळ्ये, सौ. सायली बेर्डे, सौ. पल्लवीताई पाटील, सौ. भक्ती दळी, श्री. नितीन जाधव, सौ. संगीता कवितके, श्री. नरेंद्र कदम, सौ. प्रज्ञा टाकळे, सौ. निधी आखाडे, श्री. शैलू बेर्डे, अनुराग दांडेकर, सौ. रंजना भोसले आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:12 23-07-2025