गुहागर : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या गुहागर शाखेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक व लोककलावंत शाहीद खेरटकर यांची बिनविरोध निवड केली आहे.
शृंगारतळी येथील लोकनेते स्व. रामभाऊ बेंडल सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. या कार्यकारिणीत उपाध्यक्ष मोहन पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब लबडे, सचिव ईश्वरचंद्र हलगरे, कोषाध्यक्ष दिनेश खेडेकर, युवा शाखा प्रतिनिधी योगेश होळंब, सदस्यपदी रजत बेलवलकर, रामेश्वर सोळंके, विश्वास करण्यात आली. वसेकर आदींची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीनंतर आयोजित बैठकीत कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय सदस्य व कोकण विभाग युवाशक्ती अध्यक्ष अरूण मौर्य यांनी नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीचे अभिनंदन केले. ही नवी कार्यकारिणी एप्रिल २०२५ ते मार्च २०२८ या कालावधीसाठी कार्यरत राहणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 23/Jul/2025














