रत्नागिरी : श्रावण महिन्यास शुक्रवारपासून प्रारंभ; जिल्ह्यातील शिवमंदिरे भक्तांनी फुलणार

रत्नागिरी : श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी उन पडे,’ या काव्याप्रमाणे श्रावण महिना अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, येत्या शुक्रवार , दि. २५ जुलैपासून श्रावण महिन्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे आता रत्नागिरी शहर, जिल्ह्यातील धार्मिक स्थले गर्दनि फुलणार आहेत. या महिन्यात चार आवण सोमवार असणार असून, शहरातील शिवमंदिरांत रंगरंगोटी, साफसफाई करण्यास सुरुवात झाली आहे. बाजारपेठेत विविध पूजेचे साहित्य विक्रीस सुरुवात झाली आहे.

हिंदू धर्मात आवण महिन्याला विशेष महत्व आहे. हा महिना पूजा-विधींसाठी पवित्र आणि शुभ मानला जातो. श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा-अर्चा केली जाते. यापूजने आपल्या सर्व इच्छा हा पूर्ण होतात आणि जीवनात सुख, समृ‌द्धी नांदते आणि भगवान शंकरांचे विशेष आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. यात श्रावण महिन्यात सोमवारचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदू बांधव श्रावण महिन्याची आतुरतेने बाट पाहत असतात. या महिन्यात भगवान शंकराच्या नावाने उपासना, नामजप करीत भक्तीत तल्लीन होत असतात. मागील वर्षी पाच सोमबार आले होते. यंदाच्या वर्षी चार श्रावण सोमवार असणार आहेत, श्रावणी सोमवारी कित्येक शिवभक्त यादिवशी भगवान महादेवाची विधिवत पूजा करतात. तसेच प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची उपासना करण्यासोबतच शिवमूठ अर्पण करण्याची पंरपरा आहे. विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी ही शिवमूत शंकराला अर्पण करतात. दर सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवमूठ अर्पण करीत असतात.

रत्नागिरीत शिवमंदिरांत होणार गर्दी श्रावणात रत्नागिरी जिल्ह्यात शहरातील व जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शिवमंदिरांत दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दीच गर्दी पहावयास मिळणार आहे. शहरातीत राजीवडा, तृणविद्‌केश्वर, काळबादेवी, लोटेश्वर, संगमेश्वर येथील मार्लेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर, भागेश्वर मंदिर, स्वयंभू सापतेश्वर मंदिर, वेळणेश्वर मंदिर, यासह तालुक्याती मिविध शिवमंदिरांत भक्तांची मोठी गर्दी असणार आहे

श्रावण महिन्यात पूर्ण एक महिना हिंदू बांधव मांसाहार करत नाहीत. भगवान शंकराची उपासना, नामजप करीत असतात. या महिनाभरातील प्रत्येक सोमवारी उपवास ठेवत असतात, साबुदाणा, रताळे, दूध, केळी, सफरचंद, भगर हे पदार्थ खात असतात उपवासाचे पदार्थ दाखल झाले आहेत.

सोमवारी हे धान्य अर्पण करणार

पहिला सोमवार २८ जुलै- तांदूळ
दुसरा सोमवार ४ ऑगस्ट- तीळ
तिसरा सोमवार ११ ऑगस्ट- मूग
चौथा सोमवार १८ ऑगस्ट- जवस

श्रावण महिन्यातील महत्त्वाचे सण
श्रावण महिन्यात सोमवार बरोवरच विविध प्रकारचे महत्त्वाचे सण येतात. यापैकी प्रमुख नागपंचमी, राखी पौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा आणि गोकुळाष्टमी हे सणही असणार आहेत.

पूजेच्या साहित्याने बाजारपेठ सजणार
श्रावण महिना सुरू होण्यास अवघे दोनच दिवस बाकी असल्यामुळे व्यापाऱ्याकडून विविध पूजेचे साहित्य विक्री करण्यास सुरुवात झाली आहे. बेलपात्र, दुर्वा, नारळ, अगरबत्ती, कापूर व इतर पूजेचे साहित्य बाजारपेठेत विक्रीस ठेवण्यात आले आहे. दरम्यान, ज्याठिकाणी शिवमंदिर आहे त्याठिकाणी पूजेच्या साहित्याला विशेष मागणी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:31 PM 23/Jul/2025