गुहागर : आबलोलीत महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात

गुहागर : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील पागडेवाडी येथील सभागृहात महसूल विभाग तहसीलदार कार्यालय गुहागर मंडळ स्तरावरील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान नुकतेच उत्साहात झाले.

या शिबिरात आबलोली पंचक्रोशीतील आबलोली, शीर, मासू, खोडदे, पाचेरी आगर, पाचेरी सडा, भातगाव, शिवणे, कुडली, जांभारी, आवरे, असोरे, काजुर्ली अशा एकुण २५ गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि शेतकरी बंधू भगिनीनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबलोलीचे ग्राम महसूल अधिकारी व्ही. व्ही. जोशी यांनी कंले. ग्रीस्टॅक योजनेची माहिती कुडलीचे ग्राम महसूल अधिकारी एस. एस. पिटले, शिवणे येथील ग्राम महसूल अधिकारी एस. पी. जाधव यांनी ई पीकपाणी, भातगाव येथील ग्राम महसूल अधिकारी ए. बी. बरकडे यांनी सलोखा योजनेची माहिती दिली. त्यानंतर उत्पन्न दाखले, नॉन क्रिमिलेअर दाखले, वय अधिवास दाखले, ७/१२, ८ अ, फेरफार, डिजिटल हयात दाखले वितरित करण्यात आले.

यावेळी आबलोली गावच्या सरपंच वैष्णवी नेटके, खोडदे गावच्या सरपंच पूजा गुरव, सडे जांभारी गावच्या सरपंच वनिता डिंगणकर, माजी सरपंच प्रमोद गोणवरे, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा कदम, गावकर अनंत पागडे, सामाजिक कार्यकर्ते यशवंत पागडे, शालिनी शितप, माजी सरपंच प्रमेय आर्यमाने, नरेश निमूणकर, आबलोलीचे पोलिस पाटील महेश भाटकर, शीरचे पोलिस पाटील संदीप घाणेकर आदी उपस्थित होते. आबलोलीचे ग्राम महसूल अधिकारी व्ही. व्ही. जोशी यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 23/Jul/2025